औरंगाबाद: विलासराव देशमुख म्हणायचे विरोधकांना आपण केलेले चांगले काम दिसत नाही म्हणून असा चष्मा तयार करा. ज्यातून आमच्या विकासाच्या योजना त्यांना दिसतील. अमित देशमुख यांनी विलासराव देशमुख व काळदाते यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते सोमवारी (दि. ३१) सायंकाळी लातूर शहरातील नवीन रेणापूर नाका परिसरातील डॉ. सय्यद मोहमद अब्दुल सत्तार यांच्या एएसआय हॉस्पिटल अँड स्किन केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, मौलाना इस्त्राइल साहब रशिदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अशोक गोविंदपूरकर आदींसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री अमित देशमुख म्हणाले की, लातूर आता अग्रगण्य शहर म्हणून ओळखले जात आहे. शहरात सर्वधर्मसमभावाने लोक गुण्यागोविंदाने नांदतात. त्यामुळेच लातूरची प्रगती झाली आहे.
अल्पसंख्याक समाजातून कष्टाने युवक उभे राहत आहेत जगप्रसिद्ध रुग्णालयात अनुभव घेऊन ते लातूरकरांच्या सेवेत रुजू होत आहेत यातून लातूरकरांना गुणवंत डॉक्टर उपलब्ध होत आहेत. लातूर आता डॉक्टरांचे व रुग्णालयांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. महानगरपालिका लातूरच्या चारही दिशांना स्मार्ट क्लिनिक उभारणार आहे. आंतरराष्ट्रीय वैद्यकीय सेवा लातूरकरांच्या दारापर्यंत आणणार आहोत. लातूरकरांच्या आरोग्याची काळजी घेणारी लातूर महानगरपालिका आहे अल्पसंख्यांक समाजातील डॉक्टरांनीही बीएसी नर्सिंग वैद्यकीय शिक्षण देणारी कॉलेज सुरू करावेत त्यांना आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
महत्वाच्या बातम्या:
- ‘हे निवडणुकीचं बजेट’; आदित्य ठाकरेंची टीका
- नितेश राणेंना मोठा धक्का; सिंधुदुर्ग न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
- “माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?”, दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर उत्तरला…
- सोयगाव नगरपंचायतीमधील ४ सदस्यांचा भाजपला रामराम; शिवसेनेत प्रवेश, सत्तारांचा रावसाहेब दानवेंना झटका!
- आगामी वेस्टइंडीज विरुद्ध इंडिया टी-२० मालिकेसाठी ममता बनर्जी सरकारचा मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

