Share

‘हे निवडणुकीचं बजेट’; आदित्य ठाकरेंची टीका

Published On: 

मुंबई: आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी अर्थसंकल्प (Budget 2022) सादर केला आहे. यात त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. १ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. तब्बल ६० लाख नव्या नोकऱ्या, ४०० नव्या वंदे भारत ट्रेन अशा धडाकेबाज घोषणांनी बजेटची ओपनिंग केली. मात्र, यासाठी निधी कसा आणि कुठून आणणार याचा उल्लेख त्यांनी भाषणात तरी केला नाही.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेल्या बजेटनंतर विरोधकांनी चंगलीच टीका करायला सुरुवात केली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी टीका करत म्हणलं की, पगारदार आणि मध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प. कोविड काळात संकटात सापडलेल्या मध्यमवर्गासाठी आयकरात कुठलाच बदल किंवा सवलत नाही. हे सरकार संवेदनशील नाही. सामान्य माणसांचा आवाज ऐकायचा नाहीच असंच सरकारने ठरवलेले दिसते, अशी टीका केली त्यांनी केली होती.

आता शिवसेना नेते तसेच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी देखील या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, हे अर्थसंकल्प वाटत नसून जाहीरनामा वाटत आहे, यात घोषणा जास्त करण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे निवडणुकीचं बजेट वाटत आहे. या बजेटमध्ये जास्त तरतूद दिसत नाहीत. जीएसटी जो वाढवला आहे त्याचा राज्यांना काय फायदा होणार, जीएसटी परतावा मिळत नसल्याने आर्थिक अडचण होत आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!