Share

“माझं कुठलं पात्र तुम्हाला आवडतं?”, दीपिका पादुकोणच्या प्रश्नावर पती रणवीर उत्तरला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) तिच्या दमदार अभिनयामुळे लोकप्रिय आहे. तिचे बरेच चित्रपट सुरपहीट ठरले आहेत. तसेच तिने साकारलेल्या भूमिका देखील प्रेक्षकांना कायम लक्षात राहतात. नुकतचं एका व्हिडीओच्या माध्यमाने तिने चाहत्यांना विचारलेल्या प्रश्नावर पती रणवीरसह अनेकांनी कमेंट केली आहे.

दरम्यान दीपिका पदुकोणने एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तिने आता पर्यंत साकारलेली पात्र सांगितली आहेत . ‘ओम शांती ओम’ मधलं तिचं शांती प्रिया हे पात्र, राम लिलामधलं लीला, ये जवानी है दिवानीमधलं नयना, चेन्नई एक्सप्रेसमधली तिची भूमिका, पीकू, आणि आता तिचा येत असलेला ‘गेहराईयाँ’ चित्रपटातील अलिशा ही पात्र आहेत. चाहत्यांना यापैकी कोणती भूमिका सर्वाधिक आवडली असं विचारलं आहे. त्यावर अनेकांनी कमेंट करून आपलं उत्तर दिलं आहे.

दीपिकाच्या या व्हीडिओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चनने आपलं आवडतं पात्र सांगितलं आहे. तिला पीकू चित्रपटातील ‘पीकू’ हे पात्र आवडल्याचं तिनं कमेंटमध्ये सांगितलं आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची देखील महत्वाची भूमिका होती. मात्र तिचा पती (husband) आणि अभिनेता रणवीर सिंहनेही (actor Ranveer Singh) आपली प्रतिक्रिया (reaction) दिली आहे. रणवीर म्हणाला, एकाहून एक सरस अशा या सगळ्यामधील एक भूमिका निवडणं कठीण असल्याचं कमेंटमध्ये नमूद केलं आहे.

तसेच आणखी एक कमेंट सर्वांचे लक्ष वेधत आहे, ती म्हणजे तिची बहिण अनिशाने (sister Anisha Padukone) तर चक्क मला ‘तू’ आवडतेस अशी कमेंट केली आहे. तसेच दीपिका तिच्या ‘गेहराईयाँ’ या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रमांमध्ये हजेरी लावत आहे. नुकतंच बिग बॉस १५ च्या ग्रॅण्ड फिनालेला उपस्थित होती.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!