Share

आगामी वेस्टइंडीज विरुद्ध इंडिया टी-२० मालिकेसाठी ममता बनर्जी सरकारचा मोठा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे इनडोअर तसेच आऊटडोअर खेळांसाठी विनाप्रेक्षक सामने भरवण्यात यावे अशी सूचना गेल्या महिन्यात केंद्र सरकार तर्फे करण्यात आली होती. मात्र लसीकरणाचा वेग वाढल्याने आगामी वेस्टइंडीज विरुद्ध इंडिया मधील होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी पश्चिम बंगाल सरकारने ७५ % प्रेक्षकांच्या उपस्थितीस परवानगी दिली आहे. येत्या १६ फेब्रुवारी पासून वेस्टइंडीज विरुद्ध इंडिया यांच्यात ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे.

गेले दोन वर्ष कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्टेडियम मध्ये प्रेक्षकांविना सामने होत होते. प्रेक्षकांना स्टेडियममध्ये जाण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता कोविड प्रतिबंधक लसीकरणाने वेग पकडल्याने पश्चिम बंगाल सरकारने स्टेडियममध्ये सामने पाहण्यासासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली आहे. गेल्या वर्षीच्या (२०२१) फेब्रुवारी महिन्यात झालेल्या इंग्लंड विरुद्ध इंडिया सामन्यांसाठी अहमदाबाद येथे ५० % प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी दिली होती, परंतु भारतात कोरोनाची दुसरी लाट वाढत गेल्या मुळे २ सामने विनाप्रेक्षक खेळवण्यात आले होते. १६ फेब्रुवारी पासून सुरु होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी १ लाख क्षमता असणाऱ्या ईडन गार्डन मध्ये आता ५० हजार प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी मिळणार आहे. कायरान पोलार्डच्या नेतृत्वाखाली वेस्टइंडीज संघ अहमदाबाद येथे ६ फेब्रुवारी पासून ३ वनडे सामने खेळणार आहे ; तर त्यानंतर १६ फेब्रुवारी पासून कोलकत्ता मधील प्रसिद्ध ईडन गार्डन येथे टी-२० मालिका सुरु होणार आहे.

वेस्टइंडीजच्या इंडिया दौऱ्याचे वनडे सामने जयपूर, कोलकत्ता आणि अहमदाबाद या तीन शहरात होणार होते. तर वेस्टइंडीज इंडिया मालिकेतील टी-२० सामने कटक, विशाखापट्टणम आणि तिरुअनंतपूरम या शहरात होणार होते. मात्र देशात वेगाने वाढणारे कोरोना रुग्ण आणि ओमिक्रोन विषाणूची वाढती संख्या या पार्शवभूमीवर वनडे आणि टी-२० मालिकेतील सर्व सामने अनुक्रमे अहमदाबाद आणि कोलकत्ता या दोन शहरातच खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२१ मधील नोव्हेंबर महिन्यात न्यूझीलंड विरुद्ध इंडिया मधे झालेल्या टी-२० सामन्यासाठी ७०% प्रेक्षकांना ईडन गार्डन मध्ये उपस्थितीत राहण्यास परवानगी दिली होती. ईडन गार्डन मध्ये होणाऱ्या आगामी टी-२० मालिकेसाठी ७५ % प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आल्यामुळे क्रिकेट रसिकांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:  

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!