मुंबई: भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग सत्र न्यायालयाने नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळला (Sindhudurg Court rejects BJP MLA Nitesh Rane Bail Application) असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान नितेश राणे आता सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात दाद मागणार असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत (District Bank Chairman Satish Sawant)यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी (Santosh Parab attack case) नितेश राणे यांचा अटकूपर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने गुरुवारी फेटाळला होता. यावेळी नितेश राणेंना जिल्हा न्यायालयात शरण जाण्यास तसेच नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचे निर्देश देण्यात आले होते. तर काल (३१ जानेवारी) राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.
दरम्यान नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे नितेश राणेंवर अटकेची टांगती तलवार अजूनही कायम आहे. १८ डिसेंबर २०२१ रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत येथे हल्ला झाला होता. याप्रकरणी आमदार नितेश राणे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
- आगामी वेस्टइंडीज विरुद्ध इंडिया टी-२० मालिकेसाठी ममता बनर्जी सरकारचा मोठा निर्णय
- “राजाला जर कल्याण साधायचं असेल…”, अर्थसंकल्पादरम्यान निर्मला सीतारामण यांनी दिला महाभारताचा संदर्भ
- टी २० वर्ल्ड कप मधील गोलंदाजी विषयी हार्दिक पंड्याने केला मोठा खुलासा
- नासाची एक चूक अन् अंतराळवीर कल्पना चावलाचा अंत..! वाचा नेमकं काय घडलं होतं?
- ‘माध्यमवर्गाच्या तोंडाला पाने पुसणारा अर्थसंकल्प’; यशोमती ठाकूर यांची टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

