मुंबई : बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याच्या ‘शेरशाह’ चित्रपटची प्रचंड चर्चा होत आहे. चित्रपट १२ ऑगस्ट रोजी अॅमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सिद्धार्थने कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका साकारली असून त्याच्या या भूमिकेचे कौतुक होत आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.
एखादा बायोपिक करताना त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर आधारित कथा सांगितले जाते. परंतु बायोपिक करताना काही काल्पनिक सीन देखील तयार केला जातो. तसेच ‘शेरशाह’ या चित्रपटात देखील एक सीन काहीसा काल्पनिक दाखवण्यात आला आहे.
या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा कॅप्टन विक्रम बत्रा यांची भूमिका करताना पॉइंट ५१४० काबिज केल्यावर विक्रम बत्रा जेव्हा खालती बेसला परततात तेव्हा चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की ते त्यांच्या प्रेयसीला फोन करून ही बातमी देतात. मात्र खऱ्या आयुष्यात हा फोन ते प्रेयसीला केला नसून त्यांच्या वडिलांना फोन करण्यात आला आहे.
एका मुलाखती विक्रम बत्रा यांच्या वडिलांनी हा खुलासा केला आहे. यावेळी ते म्हणाले, “विक्रमने फोन केल्यावर त्याचं पहिलं वाक्य होतं बाबा मी तो पॉइंट काबिज केला. सॅटेलाईट फोन असल्याकारणाने मला नीट कळंल नाही. मला वाटलं की विक्रमला शत्रूने बंदिस्त बनवले आहे.
पुढे ते म्हणाले, ‘पण विक्रमला बंदी बनवण्यात आलं असतं तर तो माझ्याशी बोलला नसता. म्हणून मी विक्रमला शुभेच्छा दिल्या’. मात्र हा सीन दाखवताना विक्रम डिंपलला फोन करताना दिसतात. परंतु असे दाखवले असताना देखील हा सीन कोणताही प्रकारे काल्पनिक वाटत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फक्त राणे नव्हे, तर रावसाहेब दानवेंनेही अशीच भाषा वापरली’, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- ‘राणेंचं बोलणं योग्य, थोबाडीत मारली असती हा कॉमन संवाद’, भाजपकडून राणेंची पाठराखण
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

