🕒 1 min read
हिंगोली : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच पेटले. राज्यात ठिकठिकाणी निदर्शने झाली. आंदोलनं, दगडफेक राज्यात झालेल्या अशाप्रकारच्या राड्यानंतर अखेर नारायण राणेंना अटकही झाली होती. मात्र आता शिवसेनेचे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी राणेंना धमकी दिली आहे.
नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो. तुझ्या घरात घुसून मारण्याची धमक आहे. फक्त माझं पोलीस प्रोटेक्शन जरा बाजूला कर, असा राणेंचा एकेरी उल्लेख करत आमदार संतोष बांगर यांनी राणेंना धमकी दिली आहे. बांगर यांच्या धमकीवरुन आता नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या एका आमदाराने राणेंना भाजपचं पिसाळलेलं कुत्र अशी टीका केल्यानंतर आता आमदार बांगर यांनी नारायण राणेंना धमकी दिली. यावरुन आता भाजप-शिवसेना वाद आणखी चिघळण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांनी आपल्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान पत्रकरांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याची भाषा केल्याने राज्यभर हा वाद पेटला आहे.
दरम्यान,काल राणे यांना अटक देखील करण्यात आली होती. यानंतर महाड येथील कोर्टाने काल जामीन मंजूर केला. जामीन मिळाला असला तरीही राणेंच्या अडचणी वाढत असल्याचे दिसत आहे कारण आता नाशिक पोलिसांनी राणेंना नोटीस बजावली असून २ सप्टेंबरपर्यंत नाशिकला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ज्या पद्धतीने राज्य सरकार वागते आहे ते पाहून तालिबानी सुद्धा शरमेने आत्महत्या करतील’
- नाशिक : शिवसेना-भाजपच्या 130 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
- सामान्य शिवसैनिक ते केंद्रीय मंत्री; अटक झालेल्या राणेंचा झंझावाती प्रवास
- ‘ठाकरे सरकारच्या कारवाईला आम्ही घाबरत नाही’ ; किरीट सोमय्यांनी दिला सरकारला इशारा
- ‘भुजबळांची १०० कोटींची मालमत्ता जप्त’,किरीट सोमय्यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
