Share

‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही

Published On: 

रायगड : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि समाजात तेढ पसरवणारे विधान केल्याच्या आरोपावरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. राणे यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. प्रथमवर्ग दंडाधिकाऱ्यांनी रात्री उशिरा जामीन मंजूर केला.

नारायण राणे यांना मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास महाड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. ५५ मिनिटे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद चालला. त्यानंतर १५ हजारांच्या जातमुचलक्यांवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. यावेळी राणे यांनी भविष्यात पुन्हा असे वक्तव्य करणार नाही, अशी ग्वाही दिली. महिन्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होण्याचे आदेश कोर्टाने नारायण राणे यांना दिले आहे. त्याचबरोबर, भविष्यात यापुढे असे वादग्रस्त विधान करणार नाही, अशी ग्वाही खुद्द राणेंनी कोर्टात दिली आहे. त्यावर हा जामीन मंजूर झाला आहे.

दरम्यान, पोलिसांनी राणे यांची सात दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. राणे हे केंद्रीय मंत्री आहेत. ते एक जबाबदार व्यक्ती आहेत. मग ते बेजबाबदारपणे कसे वागले, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. राणे यांनी केलेल्या वक्तव्यामागे कट आहे. त्यामुळे त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. मात्र, राणे यांच्या वकिलांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज केला होता.

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे पुणे, रायगड, नाशिक या ठिकाणी पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. नारायण राणे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शेने करण्यात आली. राणे यांच्या वादग्रस्त विधानामुळे अनेक ठिकाणी तोडफोडी च्या घटना घडल्या. तसेच पोलिस ,भाजप तसेच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!