मुंबई: केंद्रीय मंत्री राणेंचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान त्यांना चांगलेच भोवले आहे. त्यांना मंगळवारी दुपारी संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास पोलीस राणे यांना घेऊन महाड येथे दाखल झाले. रात्री उशिरा त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि मंगळवारी दिवसभर सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर रात्री उशिरा पडदा पडला. परंतू नाशिक पोलिसातही गुन्हा दाखल असल्याने, त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यानुसार २ सप्टेंबरला नारायण राणे यांना नाशिक पोलिसांत हजेरी लावायची आहे. मात्र भाजपकडून त्यांची पाठराखण केले जात असल्याचे दिसून येत आहे.
नारायण राणेंचे वाक्य योग्य असल्याचे भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर थोबाडीत मारली हा कॉमन संवाद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप एकप्रकारे राणेंची पाठराखण करत असल्याचे यातून स्पष्ट होते.
दरम्यान कालच्या याचिकेत राणेंची सही नव्हती. त्यामुळे त्यांची सही घेऊन आज पुन्हा नव्याने याचिका दाखल करण्यात येणार आहे. राणेंविरोधात पुणे, नाशिक, महाड आणि ठाणे पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे रद्द करण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. याविरोधात सुनावणी आज होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘फक्त राणे नव्हे, तर रावसाहेब दानवेंनेही अशीच भाषा वापरली’, बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
- ‘जीभ ताब्यात ठेवा… शिवसैनिक ठाम आहे’; ठाण्यातील ‘त्या’ पोस्टरची चर्चा
- अनिल परब यांच्याविरोधात भाजप कोर्टात जाणार; चंद्रकांत पाटलांचा इशारा
- ‘भविष्यात पुन्हा असे बोलणार नाही’, नारायण राणेंची कोर्टात ग्वाही
- ‘नारायण राणेंच्या घरात घुसून कोथळा बाहेर काढतो’; शिवसेनेच्या आमदाराची धमकी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
