मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीनं २०१६ साली आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्या प्रकरणी अभिनेता राहुल राज सिंह याला अटक करण्यात होती. त्यानं तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला जात होता. त्यानंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आले होतं. मृत्यूपूर्वी प्रत्युषा गरोदर होती. तिच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या घटनेला पाच वर्ष झाल्यानंतर विकास गुप्ताने एक मोठा खुलासा केला आहे.
क्रिएटिव्ह डायरेक्टर विकास गुप्ताने प्रत्युषा बॅनर्जीला डेट केलं होतं आणि ते दोघेही कित्येक वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअप झाल्यानंतर विकास बायसेक्शुअल आहे हे प्रत्युषाला कळलं. ‘इतर काही लोकांनी माझ्याबद्दल चुकीच्या गोष्टी प्रत्युषाला सांगितल्या आणि त्यावरून तिने माझ्यासोबत ब्रेकअप केलं. ब्रेकअप नंतर मी तिच्यावर खूप नाराज होतो. त्यानंतर एकदा रस्त्यावर आम्ही भेटलो होतो, त्यावेळी ती मला न पाहताच निघून गेली. तिने मला जाब विचारण्यासाठी भेटायला बोलवलं होतं. मला प्रत्युषा आवडत होती. तिच्यासोबत एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करायची इच्छा होती,’ असं विकास गुप्ताने सांगितलं.
यावेळी विकास गुप्ताने तिच्या बॉयफ्रेंडबद्दल देखील अनेक खुलासे केले आहेत. यावेळी तो म्हणाला, ‘प्रत्युषाचा मृत्यूच्या दिवशी तिचा बॉयफ्रेंड राहूल राज हॉस्पिटलबाहेर चिप्स खात बसलेला होता. मी ज्यावेळी तिथे पोहोचलो, त्यावळी तिथे मकरंद मल्होत्रा होता आणि लोकांना फोन करत होता. राहूलच्या आधी प्रत्युषाने मकरंदला डेट केलं होतं आणि त्या दोघांचं नातं ही खूप चांगलं होतं.’ असे धक्कादायक खुलासा त्याने केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- आगामी टी-20 विश्वचषकात मी गोलंदाजी करणार; हार्दिकचा निर्धार
- शिवसेनेच्या माजी खासदाराच्या पुतण्याची दादागिरी, लसीकरण केंद्रावर डॉक्टरला मारहाण
- ‘द्रविडने भारतीय क्रिकेटमध्ये उभी केली युवा खेळाडूंची भक्कम वॉल’; डेव्हिड वॉर्नरने केली स्तुती
- कोरोना प्रादुर्भावामुळे वॉर्नर आणि स्टॉयनीसची ‘या’ लीग मधुन माघार
- यामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटू भारतीयांपेक्षा मागे, इमाम-उल-हकने सांगितले ‘हे’ कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

