सोलापूर : मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून चांगलेच राजकारण रंगले आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप करण्यात मश्गुल असल्याचे दिसून येत आहे. भटक्या विमुक्तांच्या मुक्ती दिनानिमित्त मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज सोलापुरात मोठा मेळावा पार पडला. या वेळी त्यांनी उपस्थितांसमोर आपली भूमिका मांडली.
ज्यांना आरक्षण हवे आहे, त्यांनी स्वतंत्रपणे त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करावेत. मात्र, आमच्या हक्काचे जे आहे, त्यातून काही मागू नका, अशी भूमिका मदत विजय वडेट्टीवार यांनी सोलापुरात स्पष्ट केली. राज्यातील मोठ्या नेत्यांना हात जोडून विनंती करतो की, आमच्या हक्काचे आहे, तसेच राहू द्या. हक्कासाठी लाखोंच्या संख्येने रस्त्यावर येण्याची आमची तयारी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.
इतकंच नाही तर, ‘ओबीसींना भटक्या विमुक्तांना आरक्षण देण्यासाठी आम्ही वाट्टेल ते करू. रस्त्यावर उतरू. तरीही आरक्षण नाही मिळालं तर घोंगडी आणि काठी हातात घेऊ. या भटक्या समाजासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडायला तयार आहोत. बावनकुळेजी एकदा आम्हाला त्यांच्याकडे घेऊन चला,’ अशी सादच बावनकुळेंना वडेट्टीवार यांनी सर्वांसमोर घातली.
पुढे ते म्हणाले कि, ओबीसी, व्हीजेएनटी समाजाची ताकद मोठी असतानाही आज हा समाज दुसऱ्याकडेच मागतो आहे. परंतु, समाजाने ताकद दाखवताना संघटित झाल्यास, निश्चितपणे देण्याची ताकद निर्माण होईल. ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षण मिळवून देणारच, असा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेच्या पायाखालची वाळू घसरलीये, मंत्र्यांची अजून मोठी यादी तयार’; चंद्रकांतदादांच्या विधानाने खळबळ
- ‘सर्वसामान्य लोकांनी काय पाप केलंय? शिवसेना खासदार मागच्या दाराने सिद्धिविनायकाच्या दर्शनाला’
- ‘सत्तेच्या गैरवापराबद्दल सुप्रिया सुळेंनी त्यांच्या वडिलांना विचारावे’ ; चंद्रकांत पाटलांचा टोला
- रणरागिणीने फोडली डरकाळी; ‘…अशा लोकांना न घाबरता कारवाई सुरुच ठेवणार’
- ‘होय, हे स्वातंत्र्ययुद्धच ! रँड असाच वागायचा तेव्हा चाफेकर बंधुंनी आवाज उठवला; आताही…’


