मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद विकोपाला जाण्याची चिन्हे आता दिसू लागले आहेत. शिवसेनेचे नेते तथा राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यानंतर सेनेच्या खासदार भावना गवळी यांनाही ईडीने नोटीस बजावली आहे. दरम्यान यावरूनच महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या नागपूर दौर्यावर असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी त्या बोलताना म्हणाल्या कि, ‘ईडीचा कायम राष्ट्रवादी काँग्रेसला फायदाच झालाय, आमच्या जेष्ठ नेत्यांना, सगळ्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे, असं मी कधीच पाहिलं नाही. कुणाच्या आईला, कुणाच्या बायकोला पोलीस स्टेशनला बोलवलं जातं. ही कुठली संस्कृती आहे? ते काय विचार करतात हे मी नाही सांगू शकत, पण हे सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा भारतीय संस्कृतीत कधी असं पाहिलं नाही.’ असे मत त्यांनी मांडले होते.
सुप्रिया सुळे यांच्या या वक्तव्याचा आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समाचार घेतला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार मधील लोकांना ईडीचा फायदा होणार असेल वाटत असेल तर त्यांनी पेढे वाटावे.. सुप्रिया सुळे यांना असे वाटत असेल की सत्तेचा गैरवापर या आधी इतका कधीच झाला नाही तर त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारा की इंदिरा गांधी यांनी सत्तेचा गैरवापर कसा केला गेला.’ अशी विचारणा चंद्रकांत पाटील यांनी आता सुळे यांना केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- आपले चिरंजीव यात्रा काढतात तेव्हा ती महाराष्ट्र घडवायला असते मात्र इतरांनी काढली की त्रास सुरू होतो का ?
- संतापजनक : महिला अधिकाऱ्यावर फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; दोन बोटं तुटली
- ‘बंद है मंदिर, बंद पाठशाला, खुली है लेकीन ‘मधुशाला’; भाजप महिला मोर्चाचा हल्लाबोल
- धार्मिक स्थळं बंद करण्यामागे सरकारचा हेतू काय?, राणाजगजितसिंह पाटील यांचा सवाल
- सरकारच्या नाकावर टिच्चून मनसेने मध्यरात्री दहीहंडी फोडली; पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

