गोंडपिपरी : राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन तंटामुक्त गाव मोहिमेचा विशेष शांतता पुरस्कार प्राप्त करंजी गावची ओळख न्यारीच आहे. प्रेमविवाहाने तर गावचे नाव सातासमुद्रापलिकडे गेले. राज्याचे मदत,पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवारांची जन्मभुमी करंजी आहे. चार हजार लोकवस्तीच्या करंजी गावच्या मुख्य प्रवेशद्वारावर मात्र केवळ चार घरांच्या गुड्याचे फलक लावण्यात आले. .यामुळे या मार्गावरुन ये-जा करणारे प्रवासी बुचकाळ्यात पडले. गावाचा फलकच मुख्य मार्गावर दिसेनासा झाला. यामुळे चक्क पालकमंत्र्यांचे गाव हरवलं…! असे म्हणायची वेळ आली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील करंजी हे सामाजिक, राजकीयदृष्ट्या पुढारलेले गाव. तालुक्यातील 98 गावात हे गाव सदैव मुख्य प्रवाहात असते. चार हजार लोकसंख्येच्या या गावालगत महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाने 35 एकराचा भुखंड 1980 च्या दशकात अधिग्रहित केला. राष्ट्रसंताच्या पदस्पर्शाने पावन या गावाने तंटामुक्त गाव मोहिमेत उल्लेखनीय कार्य करत विशेष शांतता पुरस्कार मिळविला. प्रेमवावाहाची लगभग शंभरी गाठलेल्या करंजी नगरीची ख्याती सातासमुद्रापलीकडे गेली.
वडेट्टीवारांचे वडील नामदेवराव वडेट्टीवार करंजीचे सरपंच राहिले. याच दरम्यान, वडेट्टीवारांचे बालपण करंजीत गेले. गावच्या मातिशी त्यांची नाती जुळली आहेत. हा ऋणानूबंध वडेट्टीवारांनी कायम ठेवला. जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा येताच त्यांनी गावच्या सर्वागीन विकासासाठी पुढाकार घेतला आहे. अश्या एक ना अनेक बाबीने स्वयंपूर्ण असलेल्या गावाच्या प्रवेशद्वारावर करंजी ऐवजी डूबगोडा नावाचे फलक लावण्यात आले.
डूबगोडा हा केवळ चार घरांचा पाडा आहे. जंगलालगत वसलेल्या या पाड्यावर जाण्यासाठी करंजी गावामधून 3 किलोमिटरचा प्रवास करावा लागतो. बामनी ते नवेगाव(वा.)पर्यंतच्या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीने काही दिवसांपूर्वी हा बोर्ड करंजीच्या प्रवेशद्वारावर लावला आणि एकच गोंधळ उडाला. गावकरीही बुचकाड्यात पडले.
महत्वाच्या बातम्या:-
- अंबाती रायडूने लगावली निवड समितीला सणसणीत चपराक !
- महाराष्ट्रातील ‘या’ संपूर्ण जिल्ह्यात होणार मास्कची सक्ती, पालकमंत्र्यांनी दिले आदेश
- शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची वेळ येते त्यावेळी केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेते – बाळासाहेब थोरात
- मोठी बातमी : प्रचंड गोंधळात राज्यसभेत कृषि विधेयके मंजूर
- कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ नगर-मनमाड रस्त्यावर केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन


