Share

कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ नगर-मनमाड रस्त्यावर केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नगर-मनमाड महामार्गावर काल रास्ता रोको करून केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

काल दुपारी नगर-मनमाड रस्त्यावरील बाजार समिती समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पोलीस निरीक्षक देशमुख व सहाय्यक निरीक्षक सचिन बागुल यांनी मोरे यांना अटक करण्याचा प्रयत्न केला. अटक केल्यास आंदोलन आणखी तीव्र केले जाईल असा इशारा मोरे यांनी दिल्यावर पोलिसांनी सौम्य भूमिका घेतली.

यावेळी तालुकाध्यक्ष दिनेश वराळे, सतीश पवार, आनंद वने, सचिन पवळे, प्रमोद पवार, निलेश लांबे, प्रवीण पवार, किशोर वराळे, विजय तोडमल, सचिन म्हसे, सचिन गडगुळे, अतुल तनपुरे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते व स्थानिक कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या:-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!