नवी दिल्ली : आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी राज्यसभेत कृषि विधेयके मांडण्यात आली. संसदेच्या वरिष्ठ सदनात विधेयकावर चर्चेनंतर कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी उत्तर दिलं. तोमर हे उत्तर देत असताना विरोधकांनी मात्र राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. या गोंधळातच कृषि विषयक विधेयके राज्यसभेतही मंजूर झाले आहेत. आवाजी मतदानाने हे विधेयके राज्यसभेत मंजूर करण्यात आले आहे. राज्यसभेचं कामकाज उद्या सकाळी ९.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलंय.
यात विशेष म्हणजे राज्यसभेचं कामकाज आज दुपारी १.०० वाजता पूर्ण होणार होतं. परंतु, विधेयक संमत करून घेण्यसाठी उपसभापतींनी सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला. उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला.
दरम्यान, राज्यसभेत ही विधेयके मंजूर करवून घेण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरु होते. भाजपने पक्षादेश काढून सर्व सदस्यांना उपस्थित राहण्यास बजावले होते. या विधेयकांना देशभरातील शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील NDA जुना घटकपक्ष असलेल्या अकाली दलाने या विधेयकांविरोधात भूमिका घेतली होती. अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता.
महत्वाच्या बातम्या
- कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ नगर-मनमाड रस्त्यावर केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन
- नागवडे नेमके कोणत्या पक्षाचे?; हर्षवर्धन पाटील, विखेंना टाळत नागवडे यांचा थोरातांच्या हस्ते कार्यक्रम
- अंबाती रायडूने लगावली निवड समितीला सणसणीत चपराक !
- महाराष्ट्रातील ‘या’ संपूर्ण जिल्ह्यात होणार मास्कची सक्ती, पालकमंत्र्यांनी दिले आदेश
- शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची वेळ येते त्यावेळी केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेते – बाळासाहेब थोरात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

