Share

महाराष्ट्रातील ‘या’ संपूर्ण जिल्ह्यात होणार मास्कची सक्ती, पालकमंत्र्यांनी दिले आदेश

Published On: 

सोलापूर : कोरोनाला हरविण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहर आणि जिल्ह्यात मास्कची सक्ती करण्याच्या सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पालिका आणि जिल्हा प्रशासनाला केल्या.

सोलापूर शहरातील वॉर्ड 15 मध्ये ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेच्या पाहणीदरम्यान दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी महापौर कांचना यन्नम, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, नगरसेवक चेतन नरोटे, वैष्णवी करगुळे, विनोद भोसले, उपायुक्त धनराज पांडे, संतोष पवार, मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. शीतल जाधव आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

दत्तात्रय भरणे म्हणाले, कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकांनी आपली आणि कुटुंबाची जबाबदारी ओळखून मास्कचा वापर करायला हवा. वारंवार हात धुवा, सॅनिटायझरचा वापर करा. गर्दीत जाणे टाळा. लहान मुले आणि वृद्धांची काळजी घ्या. त्यांना गर्दीत जावू देऊ नका. प्रत्येकाने आपले कुटुंब निरोगी राहण्यासाठी पुढाकार घेतला तर ही मोहीम यशस्वी होईल.

जिल्ह्यातून कोरोनाला हद्दपार करण्यासाठी लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, सर्व नागरिकांची साथ हवी. ग्रामीण नागरिकांनीही आपली आणि कुटुंबाची जबाबदारी घ्यायला हवी. शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे योग्य पालन केले तर कोरोनाला दूर ठेवता येते. प्रशासकीय पातळीवर रूग्ण आणि मृत्यूदर कमी करण्यासाठी योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडणार नसल्याची खात्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

नागरिकांचा या मोहिमेत सहभाग महत्वाचा आहे. माणूस जगविण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम लोकचळवळ निर्माण करायची आहे. लोकप्रतिनिधींनी जनजागृतीचे काम करण्याचे आवाहनही दत्तात्रय भरणे यांनी केले.

दत्तात्रय भरणे यांनी रेवणसिद्ध कोळी यांच्या घरी आरोग्य पथकांसह भेट देऊन सर्वेक्षणाची पाहणी केली. त्यांनी कोळी यांच्या कुटुंबाला गर्दी टाळा, लहान मुलांची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. सर्वेक्षणादरम्यान आरोग्य पथकांनी योग्य खबरदारी घेऊन सर्वेक्षण करावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

महत्वाच्या बातम्या 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!