मुंबई : भारतीय क्रिकेट संघातील माजी फलंदाज आणि मधल्या फळीतील भरवशाचा खेळाडू म्हणून ज्याचा उदय होत होता अशा अंबाती रायडूचे करियर भारतीय संघाच्या निवड समितीने उध्वस्त केलं अस म्हंटल तर ती अतिशोयक्ती वाटणार नाही. कारण अंबाती अगदी आपल्या करीयरच्या सर्वोत्तम फॉर्म असताना त्याने आंतराराष्ट्रीय क्रिकेट मधून सन्यास घेतला आणि त्याचं मुख्य कारण होतं २०१९ साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याची न झालेली निवड.
मात्र मोठी वाट पाहिल्यानंतर आयपीएलच्या १३व्या हंगामाला शनिवारी सुरूवात झाली. भारतीय खेळाडू एका मोठा ब्रेकनंतर मैदानावर उतरले. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झालेल्या लढतीत चेन्नईने बाजी मारली. या सामन्यात चेन्नईला संकटातून बाहेर काढले ते अंबाती रायडूने, त्याने ४८ चेंडूत ७१ धावा केल्या.
रायडू जवळपास १० महिन्यांनी म्हणजे ३०७ दिवसांनी मैदानावर परतला होता. त्याने याआधी अखेरचा सामना सैयद मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत खेळला होता. हैदारबात आणि छत्तीसगड यांच्यात १७ नोव्हेंबर २०१९ रोजी हा सामना झाला होता. आता रायडूने आपली योग्यता सिद्ध करत त्याची निवड न होण किती चुकीचं होत हे दाखवून देत आपल्या खेळीतून निवड समितीला सणसणीत चपराक लगावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘शिवसेनेच्या कंगना विरोधातील आंदोलनाला परवानगी, मग मनसेच्या आंदोलनाला नोटीस का?’
- महाराष्ट्रातील ‘या’ संपूर्ण जिल्ह्यात होणार मास्कची सक्ती, पालकमंत्र्यांनी दिले आदेश
- शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची वेळ येते त्यावेळी केंद्र सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेते – बाळासाहेब थोरात
- शनिवारी राज्यात एका दिवसात बरे झाले ‘रेकोर्ड ब्रेक’ कोरोना रुग्ण…
- खबरदार! लोकलने प्रवास कराल तर कायदेशीर कारवाई; मनसे नेते संदीप देशपांडेंना नोटीस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

