Share

देशाला विकासाकडे नेण्यासाठी कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही : वडेट्टीवार

Published On: 

चंद्रपूर : केंद्र सरकारने केलेल्या तिन्ही कृषी विधेयकाविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. यावर तोडगा काढण्यासाठी शेतकरी आणि केंद्र सरकारच्या चर्चा निष्फळ ठरत आहे. सरकार चर्चेला तयार आहे. पण कृषी कायदे रद्द केले पाहिजेत त्यानंतरच चर्चा असे शेतकऱ्यांची मागणी आहे.

दरम्यान,कृषी कायद्यांचा निषेध करत शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनाला तब्बल महिना झाला आहे. दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर उभ्या असलेल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारशी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास नकार देत कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत आहेत.

दरम्यान,चंद्रपूरचे प्रतिपादन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशाची वाटचाल हुकूमशाहीच्या दिशेने सुरू आहे. दिल्लीतील शेतकरी आंदोलकांशी चर्चा करण्यास पंतप्रधानांना वेळ नाही. सर्व सरकारी कंपन्या विकण्याचा सपाटा लावला आहे. कॉंग्रेसने निर्माण केलेली संपत्ती कवडीमोल भावात खासगी कंपन्यांना विकली जात आहे. पुन्हा गुलामगिरीत ढकलण्याचा हा प्रयत्न आहे असे ते म्हणाले.

वडेट्टीवार काल भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसच्या 136 व्या स्थापना दिवस समारोहात बोलत होते. देशाला विकासाकडे नेण्यासाठी कॉंग्रेस शिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!