Share

स्टेट बँकेच्या मदतीने ‘असा’ भरा इन्कम टॅक्स रिटर्न !

Published On: 

मुंबई: कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोनदा मुदत वाढ मिळाल्या नंतर आता अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर आधी शेवटच्या ४ दिवसांत आयकर विवरण सादर करण्यासाठी सध्या नोकरदार आणि वैयक्तिक करदात्यांची धावपळ सुरु आहे. अन्यथा करदात्यांना बिलंब शुल्क भरावे लागणार आहे.

आयकर विभागाच्या माहितीनुसार २६ डिसेंबरअखेर देशभरातून ४ कोटी १५ लाख करदात्यांनी आयटीआर रिटर्न फाईल केला आहे. शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता करदात्यांनी आयटीआर रिटर्न लवकरात लवकर भरावा, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे.

यासाठी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या एसबीआयने’ त्यांच्या ग्राहकांसाठी खास ऑफर सुरू केली आहे. करदात्यांना दिलासा देणारी सुविधा एसबीआयने योनो ऍपवरून आयकर रिटर्न सादर करता येणार आहे.

योनो ऍपचा वापर करून आयटीआर फाईल करता येईल, तर ही सुविधा विनाशुल्क सादर करू शकतात. योनो ऍपवर टॅक्स२विन या द्वारे करदाते आयटीआर सादर करू शकतील, असे एसबीआयने म्हटलं आहे. यात करदात्यांना आयकर रिटर्न फायलिंग करताना ‘सीए’ची सेवा हवी असल्यास करदात्यांना १९९ रुपये भरावे लागतील, असे एसबीआयने स्पष्ट केले आहे.

एसबीआयच्या योनो ऍपवरून सेवा हवी असल्यास बँकेच्या ग्राहकांनी पुढील सूचनांचे पालन करायला हवे. योनो ऍपमध्ये लॉग इन करणे. शॉप अँड ऑर्डर ला क्लिक करावे. त्यात टॅक्स अँड इन्व्हेस्टमेंट ला क्लिक करावे. अधिक माहितीवर क्लिक करून पुढील प्रक्रिया करावी.

करदात्यांना आयकर विभागाच्या वेबसाईटवरून देखील आयकर रिटर्न फाईल करता येईल. ई फायलिंगसाठी युजरला आयकर विभागाच्या वेबसाईटवर युजर आयडी, पॅन नंबर, पासवर्ड, जन्म तारीख आणि कॅप्चा कोड टाकून लॉग इन करावे लागेल. त्यानंतर आयटीआर रिटर्नसाठी दिलेल्या सूचनांनुसार माहिती सादर करावी.

नुकतच याच ऍप वरून ऑफर अंतर्गत एसबीआय विद्यार्थ्यांना काही सेवांवर 20 टक्क्यांपर्यंत सूट देत आहे. बँकेच्या या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एसबीओ योनो अॅप वर रजिस्ट्रेशन करावं लागेल. एसबीआयचा हा उपक्रम एसबीआय आणि टेस्टबुक डॉट कॉम च्या पार्टनरशीप अंतर्गत येतो आहे. टेस्टबुक डॉट कॉम वर सर्व प्रकारचे ऑनलाइन स्टडी मटेरिअल, टेस्ट सीरिज आणि परीक्षांसाठी आवश्यक अन्य प्रकारचे नोट्स उपलब्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!