Share

भुजबळ, वडेट्टीवारांची हकालपट्टी करा, मराठा आंदोलकांची राज्यपालांकडे मागणी

Published On: 

मुंबई : राज्यात मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झालेला असताना आता मराठा आंदोलकांनी महाविकास आघाडी मधील मंत्री छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवारांची मंत्रीमादालातून हकालपट्टी करा अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली आहे. हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचं काम करत असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या 15 समन्वयकांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी छावा संघटनेचे पदाधिकारीही उपस्थित होते. या आंदोलकांनी राज्यपालांकडे आरक्षणाच्या अनुषंगाने विविध मागण्यांचे निवेदन दिलं आहे. तसेच भुजबळ आणि वडेट्टीवार यांचीही तक्रार केली आहे.

हे दोन्ही नेते सातत्याने चुकीची विधाने करून दोन्ही समाजाची दिशाभूल करत आहेत. हे दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे. तसं निवेदनही त्यांनी दिलं आहे. मंत्र्यांकडून होणाऱ्या शेरेबाजीमुळे राज्यात मराठा आणि ओबीसी संघर्ष अटळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यातून मार्ग काढावा, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी नानासाहेब पाटील, रमेश किरेपाटील आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!