🕒 1 min read
नाशिक:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने शेतमालाला कवडीमोल भाव मिळत होता. सप्टेंबरमध्ये शेतमालाला योग्य भाव मिळायला लागले असताना केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम केले होते.
यानंतर, राज्यातील शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सप्टेंबरमध्ये कांद्याला प्रतिकिलो ४० रुपयांचा भाव मिळताच, केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी करण्याचा निर्णय घेतला होता. केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी देखील सुरू झाली होती. यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक होऊन रस्त्यावर देखील उतरले होते. तर, विरोधी पक्षांनी देखील या निर्णयाचा निषेध केला होता.
सद्या, दिल्लीच्या सीमेवर नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक झाले असतानाच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारीपासून कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांचा २०२० चा शेवट या गोड बातमीने होणार आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात कांद्यानं आणलेलं पाणी तब्बल ३ महिन्यानंतर केंद्राला दिसलं आणि भाव नियंत्रणासाठी घातलेली निर्यातबंदी मागे घेण्यात आली आहे.
दरम्यान, तब्बल 105 दिवसांनतर निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. लासलगावमध्ये कांद्याच्या भावात 360 रुपयांची वाढ झाली आहे. निर्यातबंदी उठवल्यामुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. अडीच महिन्यांनतर कांद्याचा भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. तर सामान्य नागरिकांना या भाववाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. लासलगाव येथील बाजारामध्ये कांद्याचा कमाल भाव प्रतिक्विंटल 2372 रुपये असून किमान भाव 1000 रुपये आहे .तर सर्वसाधारण भाव प्रतिक्विंटलमागे 2100 रुपये इतका आहे.
महत्वाच्या बातम्या
- शिवसेनेत आहे, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार- संजय राऊत
- चित्रपटांमुळे चर्चेत असलेला अक्षय कुमार आता ‘या’ कारणामुळे आला चर्चेत
- वर्षा संजय राऊत यांचे ईडीला पत्र, हजेरीसाठी अधिक वेळ देण्याची मागणी
- सोनूच्या ‘आय एम नॉट मसिहा’ पुस्तकाला मांजरेकरांच्या मुलीने दिल्या शुभेच्या!
- ‘समृद्धी महामार्गालगतच्या शेतीसाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
