औरंगाबाद : काल (८ जून) रोजी औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. मागील काही दिवसांपासून शिवसेनेने या सभेसाठी जोरदार तयारी केली होती. औरंगाबादमध्ये गावागावात बैठका घेत शिवसेनेने शक्ती पणाला लावली होती.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा झाली. या सभेला शिवसेनेने स्वाभिमान सभा असे नाव दिले होते. राज्यभरातून शिवसैनिक औरंगाबादमध्ये या सभेसाठी दाखल झाले होते. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादच्या पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका मांडली आहे.