कोल्हापूर : संपूर्ण देशात सद्या कृषी कायद्यांना विरोध वाढत आहे. या कायद्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी देशव्यापी बंद पुकारला असून या बंदला अनेक जिल्ह्यांसह शहरात देखील पाठींबा मिळत आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
उद्या म्हणजेच 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज करण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. राज्यात या बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला.
या बंदमध्ये शेतकऱ्यांनी सामन्यांना त्रास होणार नाही अशी भूमिका जरी घेतली असली तरी काही अतिउत्साही कार्यकर्ते मात्र दुकान बंद करण्यासाठी जबरदस्ती करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुरुवातीला दुकान करण्यासाठी दादागिरी केल्यानंतर महिलेने देखील दुकान बंद करण्यास नकार दिला. तसेच, त्या तरुणांचा व्हिडीओ देखील घेतला.
आधीच कोरोनाकाळात नुकसान झालं असल्याने दुकानचालकांनी दुकाने खुली ठेवली आहेत. हा प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाल्यानंतर कोल्हापुरातील भाजप नेत्या शौमिका महाडिक यांनी तो ट्विटरवर टाकला व बघता बघता व्हायरल देखील झाला. ‘फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है.! जबरदस्ती दुकान बंद करायला लावणाऱ्या महाविकासआघाडीच्या गुंडांना महिलेचे सडेतोड उत्तर. कॅमेरा चालू आहे म्हणल्यावर पटकन भाषा बदलली यांची.. दादागिरी करणाऱ्यांना असंच उत्तर दिलं पाहिजे, बाकीच्या व्यापाऱ्यांनी यातून धडा घ्यावा.’ असं म्हणत शौमिका महाडिक यांनी हा व्हडिओ ट्विट केला आहे.
फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है.!
जबरदस्ती दुकान बंद करायला लावणाऱ्या महाविकासआघाडीच्या गुंडांना महिलेचे सडेतोड उत्तर.
कॅमेरा चालू आहे म्हणल्यावर पटकन भाषा बदलली यांची..
दादागिरी करणाऱ्यांना असंच उत्तर दिलं पाहिजे, बाकीच्या व्यापाऱ्यांनी यातून धडा घ्यावा.Proud of You???? pic.twitter.com/tizIc3DlLS
— Shoumika Mahadik (@shoumikamahadik) December 8, 2020
महत्वाच्या बातम्या
- ‘शेती हा शिवसेनेचा विषय नाही, त्यांना तेवढी अक्कलही नाही’
- नवीन कृषी कायदे हे षडयंत्र; काँग्रेसच्या आंदोलनात अशोक चव्हाणांचा हल्लाबोल
- ‘…म्हणून भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही’
- कृषी कायदा म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम; भुजबळांचा प्रहार
- भारतीय वंशाच्या ‘या’ नशीबवान व्यक्तीला सर्वात प्रथम मिळणार कोरोनाची लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

