Share

कृषी कायदा म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम; भुजबळांचा प्रहार

Published On: 

जळगाव : संपूर्ण देशात सद्या कृषी कायद्यांना विरोध वाढत आहे. या कायद्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी देशव्यापी बंद पुकारला असून या बंदला अनेक जिल्ह्यांसह शहरात देखील पाठींबा मिळत आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

उद्या म्हणजेच 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.

यापार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ‘कृषी कायदा म्हणजे रोगापेक्षा इलाज जालीम आहे. शेतकऱ्यांचं आंदोलन चिघळत आहे. त्याला शंभर टक्के केंद्र सरकार जबाबदार आहे,’ अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे. यासोबत त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं कृषी क्षेत्रातील बदलासाठीच्या व्हायरल पात्रांविषयी देखील भाष्य केलं आहे.

विरोधक हे पवार साहेबांच्या पत्राचा उल्लेख करतात. पण पवार साहेबांनी पत्राद्वारे काही सूचना केल्या होत्या. पीएमसी यात काही सुधारणा करता येईल असं साधं पत्र लिहून त्यांनी सूचना केल्या होत्या. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत हे सगळं खरेदी केलं पाहिजे. दंडुका घेऊन काय बदल करावा अस पवार साहेबांनी सांगितलं नव्हतं. कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकार केंद्राने घेतले राज्य सरकारने याबरोबर काही संबंध राहणार नाही. व्यापारी दलाल यावर कोणाचा नियंत्रण राहणार नाही. हमी भाव शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे,’ अशी मागणी करत त्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला आहे. यासंदर्भात टीव्ही ९ मराठीने वृत्त दिलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!