Share

भारतीय वंशाच्या ‘या’ नशीबवान व्यक्तीला सर्वात प्रथम मिळणार कोरोनाची लस

Published On: 

ब्रिटन : भारतासह जगभरात कोरोनाचा धुमाकुळ सुरू आहे. अशातच कोरोनाची लस कधी येणार यावर सर्व जगाचे लक्ष लागले आहे.ब्रिटनने गेल्या आठवड्यात फायझर व बायोएनटेकच्या लसीला वापरासाठी परवानगी दिली. त्यानंतर ब्रिटनमध्ये लसीकरणाला सुरूवात होणार आहे.

अनेक कंपन्यांनी लस 100 टक्के कोरोनाला हरवण्यासाठी प्रभावीशाली असल्याचं म्हटलं आहे. त्यातच आजपासून लंडनमध्ये फायझरची लस देण्यास सुरूवात होणार आहे. दरम्यान, जगात फायझरची सर्वात प्रथम कोरोना लस भारतवंशाला हरि शुक्ला यांना देण्यात येणार आहे.

हरि शुक्ला यांनी सांगितले आहे की, ‘मला आनंद होत आहे की, आपण जगावर आलेल्या महामारीविरोधात लढत आहोत.’ हरि शुक्ला यांनी सर्वात अगोदर लस घेण्याची तयारी दर्शविल्याने ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी त्यांचे स्वागत केले आहे.

लसीचे पहिले दोन डोस घेणं हे माझे कर्तव्य आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लसीकरणासंदर्भात घोषणा करून एक मोठं पाऊल उचललं आहे, अशी प्रतिक्रिया हरी शुक्ला यांनी दिली आहे. त्यांनी लस आपल्याला सगळ्यात आधी दिली जाणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ते या उपक्रमासाठी खूप उत्सुक असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. लस घेऊन मी आपलं काम करत असल्याचा आनंद आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!