Share

‘…म्हणून भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही’

Published On: 

मुंबई : केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन  करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.भारत बंदमध्ये सहभागी होण्यासाठी कोणालाही बंदी नाही. सर्वांना सांकेतिक बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी केलं.

शेतकरी नेत्यांचं म्हणणं आहे की, आंदोलनातंर्गत सकाळी 11 वाजल्यापासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत ते ‘चक्का जाम’ आंदोलन करतील. ज्यादरम्यान, प्रमुख रस्त्यांवर आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनातंर्गत उत्तरेकडील राज्यांमध्ये खासकरुन पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्लीतील शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत.

दरम्यान, दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज होणाऱ्या ‘भारत बंद’मध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही. नवीन कायदे रद्द झाले तर शेतकरी व्यापार स्वातंत्र्याचा मार्ग कायमस्वरूपी बंद होईल. शेतकऱ्यांनी ‘भारत बंद’मध्ये सहभागी होऊ नये, असं आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी काल एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलं आहे.दैनिक सकाळने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

दिल्लीमध्ये सुरू असलेलं शेतकरी आंदोलन देशातील शेतकऱ्यांच्या हिताचं नाही. सरकारनं या आंदोलनाच्या दबावामुळे नवीन कृषी सुधारणा कायदे मागे घेतले; तर पुढचे पन्नास वर्ष तरी कोणताही राजकीय पक्ष; शेती व्यापाराला स्वातंत्र्य देण्याचं धाडस करणार नाही. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार बाजार समित्या आणि हमीभाव सुरु राहणार आहे; मग आता आंदोलन सुरू ठेवण्याचं कारणच काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!