Share

नवीन कृषी कायदे हे षडयंत्र; काँग्रेसच्या आंदोलनात अशोक चव्हाणांचा हल्लाबोल

Published On: 

मुंबई : संपूर्ण देशात सद्या कृषी कायद्यांना विरोध वाढत आहे. या कायद्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी देशव्यापी बंद पुकारला असून या बंदला अनेक जिल्ह्यांसह शहरात देखील पाठींबा मिळत आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.

उद्या म्हणजेच 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. मुंबईमध्ये काँग्रेस पक्ष कृषी कायद्याच्या विरोधात रस्त्यावर उतरला आहे.

या आंदोलनावेळी मंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी कृषी कायद्यावरून केंद्र सरकारवर प्रहार केला आहे. नवीन कृषी कायदे हे एक षडयंत्र असल्याचा आरोप करत त्यांनी या कायद्यांमुळे शेतकऱ्यांच्या हातात काहीही उरणार नसून निवडक उद्योगपतींनाच याचा लाभ होणार असल्याची जळजळीत टीका देखील त्यांनी यावेळी केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!