रत्नागिरी : संपूर्ण देशात सद्या कृषी कायद्यांना विरोध वाढत आहे. या कायद्याच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी देशव्यापी बंद पुकारला असून या बंदला अनेक जिल्ह्यांसह शहरात देखील पाठींबा मिळत आहे. गेल्या 13 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
उद्या म्हणजेच 9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी आज पुकारलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे.
शिवसेनेनं देखील कृषी कायद्यांना विरोध दर्शवला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. शेती हा काही शिवसेनेचा विषय नाही. सेनेला तेवढी अक्कलही नाही. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठीच शिवसेनेने या विषयाची काही जाण नसूनही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला, असे वक्तव्य माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी केले. रत्नागिरीमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी शिवसेनेवर प्रहार केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- जनतेचं अन्न ताब्यात घेण्याचा भाजप सरकारचा प्रयत्न : बाळासाहेब थोरात
- ‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच’, हेमंत ढोमेंचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा
- ‘…म्हणून भारत बंदमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटना सहभागी होणार नाही’
- भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष – नवाब मलिक
- भारतीय वंशाच्या ‘या’ नशीबवान व्यक्तीला सर्वात प्रथम मिळणार कोरोनाची लस
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

