Share

श्रीलंकेविरुद्ध सामन्यांपूर्वी टीम इंडियाचे जबरदस्त फोटोशूट, बीसीसीआयने शेअर केला व्हिडीओ

Published On: 

🕒 1 min read

श्रीलंका : भारतीय संघाचा श्रीलंका दौरा हा सुरुवातीपासुनच अडचणीत सापडत आहे. इंग्लंडच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे भारताविरुद्ध मालिकेसाठी नवा संघ उभा करण्यात आला. यादरम्यान श्रीलंकेच्या नव्या संघातही कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती समोर आली होती.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे ही मालिका आधीच ५ दिवसांनी पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे निर्धारित कार्यक्रमानुसार ही मालिका १३ ऐवजी १८ जुलैपासून सुरु होणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील द्विपक्षीय मालिकेच्या सुधारित वेळापत्रकानंतर श्रीलंका क्रिकेटने दोन्ही संघात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या नवीन वेळा देखील शेअर केल्या आहेत.

श्रीलंका क्रिकेटच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून सामन्यांच्या वेळेत बदल झाल्याचे समोर आले आहे. श्रीलंका क्रिकेटच्या पोस्टनुसार, द्विपक्षीय मालिकेतील वनडे सामने दुपारी 2:30 ऐवजी दुपारी 3 वाजता सुरू होतील. तसेच टी-20 आंतरराष्ट्रीय सामने रात्री 8:00 वाजता सुरु होतील.

दरम्यान, मालिका सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाच्या नवख्या खेळाडूंचे फोटोशूट आणि मजामस्ती सुरु आहे. खेळाडूंच्या या फोटोशूटचा एक व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!