मुंबई : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषेद घेवून मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सध्या महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
तसेच मुंबईची लाईफलाईन असलेले लोकल सेवा सुद्धा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी बंदच आहे. लसींचे दोन डोस घेतले असतील लोकल प्रवासासाठी मुभा द्यावी अशी मागणी होत होती, पण राज्य 3 लेव्हलमध्ये असल्यामुळे कोणतीही सूट दिली जाणार नाही, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. त्यामुळे आता सर्वसामन्य मुंबईकरांना सुलभ लोकल प्रवासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
परंतु आता याच मुद्याला विरोधकांनी मात्र ठाकरे सरकारवर हल्लबोल केला आहे. ‘लसीकरणाचे दोन डोस घेतलेल्यांना प्रवाश्यांना लोकल सेवेसाठी परवानगी देण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. त्यानंतर यासंदर्भात सकारत्मक विचार करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी आपणांस दिले.
परंतु आजच्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकल सुरु करण्याबाबत सरकारने दोन-चार दिवसात निर्णय घेतला नाही. तरीही या भूमिकेपासून आपण हटणार नाही व जनतेसाठी रेल रोको करावा लागला तर त्यासाठी आपण रेल्वेच्या ट्रँक वर उतरु’ असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी ठाकरे सरकारला आता दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- माजी खासदारांना सोबत घेवून केंद्रीय पथकाची आरोग्य सुविधा केंद्रासाठी जागेची पाहणी
- ‘विष्णूपुरी, दुधना’चे दरवाजे उघडले, ९० हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू
- ..अन् आव्हाड म्हणाले, ‘माझी एकुलती एक मुलगी राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’
- मोदी सरकारची घोषणा! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ
- शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट; केशव उपाध्ये यांची टीका


