मुंबई : राज्यात आज 8 हजार 602 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 6 हजार 067 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 59 लाख 44 हजार 801 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.17 टक्के झाले आहे.
राज्यात आज 170 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 06 हजार 764 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 5 लाख 80 हजार 771 व्यक्ती होमक्वारांटाईनमध्ये आहेत. तर 4 हजार 309 व्यक्ती संस्थात्मक क्वारांटाईनमध्ये आहेत.
तर मुंबईत आज 625 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 582 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,04,259 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 96 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 6,989 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 928 दिवसांवर गेला आहे.
दरम्यान आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषेद घेवून मंत्रिमंडळात झालेल्या निर्णयांची माहिती दिली. सध्या महाराष्ट्रावर तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे राज्यात कोणतेही निर्बंध शिथिल करण्यात येणार नाही. जे नियम सध्या लागून आहे ते तसेच राहणार आहे, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- लोकल सुरु करा अन्यथा जनतेसाठी रेल रोको करु ; दरेकरांचा इशारा
- ‘विष्णूपुरी, दुधना’चे दरवाजे उघडले, ९० हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू
- ..अन् आव्हाड म्हणाले, ‘माझी एकुलती एक मुलगी राजकारणापासून कोसो दूर आहे आणि राहील’
- मोदी सरकारची घोषणा! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ
- शिक्षणाचा खेळ मांडून शैक्षणिक गुणवत्ता संपविण्याचा घाट; केशव उपाध्ये यांची टीका


