Share

‘विष्णूपुरी, दुधना’चे दरवाजे उघडले, ९० हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू

Published On: 

नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसाने शहरी भागात नागरिकांची तारांबळ उडाली तर बळीराजा सुखावला. या पावसाने जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेूत. ३१ मंडळात एकाच दिवशी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात पावसाने ताण दिल्याने बळीराजा चिंतित झाला होता. मात्र, दहा जुलैनंतर पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. यात खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत तर खरीप पिकेही बहरली आहेत.

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे नांदेड जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी तुडूंब भरुन वाहत आहे. यंदा प्रथमच विष्णुपुरी धरणाचे ६, ७, १३ आणि १४ क्रमांकाचे चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. आज बुधवारी सकाळपासून ९० हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. प्रशासनाने नदी काठच्या वीठभट्टी, मासेमारी करणाऱ्यांसह गावांना दक्षतेचा इशारा दिला आहे.

तर परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्प धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने धरणात मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. यामुळे धरणाच्या १४ दरवाज्यांतून १४,२८० क्युसेक्सने दूधना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी हवामान सेवा केंद्रास प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!