महाराष्ट्र संपविण्याचा विडा देवेंद्र फडणवीस नावाच्या खानाने उचलला आहे – अल्ताफ शेख
कल्याण: कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेनेचे शिव-संपर्क अभियान सुरू आहे. या अभियानाअंतर्गत कल्याण डोंबिवलीत विविध ठिकाणी कार्यकर्त्यांसाठी मेळावे आयोजित करण्यात येत आहे.
कल्याण पूर्वेतील एका मेळाव्यात शिवसेना उपनेते अल्ताफ शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.