🕒 1 min read
नागपूर : आज नागपूर मध्ये नवनीत राणा आणि रवी राणा हे राणा दाम्पत्य दाखल झाले आहे. नागपूरमध्ये राणा दाम्पत्य यांच्या हस्ते मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि आरती करण्यात आली. यानंतर माध्यमांशी बोलताना खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यत्वे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
नागपूरच्या मंदिरात हनुमान चालीसा पठण करणार म्हटल्यावर आमची विमानतळावर अडवणूक करण्यात आली, असा दावा नवनीत राणा यांनी केला आहे. “३६ दिवसांनंतर आम्ही नागपूरमध्ये येतोय, दर्शन करण्यासाठी जात आहोत, तेव्हा इथे एवढी सेक्युरिटी का ठेवली आहे? आम्हाला आतमध्ये बराच वेळ थांबवून ठेवण्यात आलं, असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
देवाचा एवढा विरोध महाराष्ट्रात का केला जात आहे? मुख्यमंत्र्यांना दुसरं काही काम राहिलेलं नाही का? हा शनी लवकरात लवकर महाराष्ट्रातून दूर झाला पाहिजे यासाठी मी दररोज हनुमान चालीसा आणि आरती करेन”, अशा शब्दात नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
हनुमान चालीसा पठण हा सगळा दिखावा आहे अशी टीका तुमच्यावर होते, या प्रश्नावर नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “आम्ही दिखाव्यासाठी करतो, मुख्यमंत्री दिखाव्यासाठीही करत नाहीत. आपल्या मुख्यमंत्र्यांनी एकदा दिखाव्यासाठीच का होईना, एकदा हनुमान चालीसा वाचावी” असं नवनीत राणा म्हणाल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

