Share

IPL 2022 RR vs RCB Qualifier 2 : विराट कोहलीनं मैदानातच केलं असं काही तरी, जिंकली लाखो चाहत्यांची मने; पाहा VIDEO!

Published On: 

मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा प्रवास संपला आहे. बंगळुरूच्या सांगायला यावेळीही प्लेऑफमध्ये प्रवेश करता आला. मात्र ते पुन्हा एकदा अंतिम सामना खेळण्याअगोदरच स्पर्धेतून बाहेर पडले. बंगळुरू संघाचा महत्त्वाचा फलंदाज विराट कोहलीसाठीही हा हंगाम खास नव्हता. संघाच्या क्वालीफायर २ सामन्यात विराट स्वस्तात बाद झाला, पण या सामन्यात त्याने असे काही केले, ज्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली.

राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या क्वालिफायर २ सामन्यात विराट कोहलीने ८ चेंडूत ७ धावा केल्या. राजस्थानकडून डावात ट्रेंट बोल्ट पहिले षटक टाकत होता, विराटने या षटकातील दुसरा चेंडू एक धाव घेण्यासाठी खेळला. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने गेला, मात्र जोस बटलरने चांगली क्षेत्ररक्षण केले आणि लगेच चेंडू नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला फेकला. बटलरचा थ्रो कोहलीच्या पायावरून लाँग ऑनच्या दिशेने गेला, पण विराटने खिलाडूवृत्ती दाखवत धाव घेण्यास नकार दिला. कोहलीचा क्रिकेट स्पिरिट पाहून चाहते त्याचे खूप कौतुक करत आहेत.

विराटचा खराब फॉर्म कायम

आयपीएल २०२२ चा हंगाम विराट कोहलीसाठी काही खास राहिला नाही. या मोसमात विराट कोहली सतत फॉर्मशी झुंजताना दिसला. विराट कोहलीने लीग टप्प्यातील १४ सामन्यांमध्ये २३.७७ च्या सरासरीने ३०९ धावा केल्या. त्याचबरोबर या मोसमात खेळल्या गेलेल्या १६ सामन्यांमध्ये २२.७३ च्या सरासरीने ३४१ धावा केल्या. विराट कोहलीने या मोसमात केवळ ११५.९९ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या. त्याला फक्त २ अर्धशतके करता आली आहेत.

बंगळुरूचा यंदाच्या हंगामामधील प्रवास

आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात चांगली झाली होती, मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला. तरीही इतर संघाच्या खराब कामगिरीमुळे बंगळुरू संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला. बंगळुरूने सलग तिसऱ्यांदा प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. संघाने साखळी टप्प्यातील १४ पैकी ८ सामने जिंकले आणि ६ सामने गमावले होते.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!