मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022) हंगाम काही भारतीय स्टार खेळाडूंसाठी अत्यंत खराब राहिला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या खेळाडूंनाही आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याचबरोबर असे काही खेळाडू आहेत जे भारतीय संघात खेळले आहेत. तर काही खेळाडू भारतीय संघात स्थान मिळविण्यासाठी झटपट आहेत. यंदाच्या आयपीएल हंगामात विजय शंकर आणि मनदिप सिंग या खेळाडूंना चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्यांना पुढच्या आयपीएल हंगामात संघ बाहेरचा रस्ता दाखवू शकतात.
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात गुजरात आणि राजस्थान या दोन्ही संघांनी दमदार कामगिरी करत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. यंदाच्या हंगामात नव्याने समावेश झालेल्या लखनऊ आणि गुजरात या संघांनी प्रस्थापित संघांचा बाजार उठवला. मुंबई आणि चेन्नई सारख्या मजबूत संघानाही धूळ चारली. यंदाचा आयपीएल हंगाम सगळ्यात रंजक ठरला, कारण मागील दशकापासून आयपीएलमध्ये चर्चेत असलेल्या दोन्ही संघांना यंदाच्या हंगामात पात्रता फेरी गाठता आलेली नाही.
विजय शंकरला संधी मिळूनही कामगिरीत कमतरता
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेल्या अष्टपैलू खेळाडू विजय शंकरची भारतीय संघापाठोपाठ आता आयपीएल मध्ये खराब कामगिरी राहिली आहे. आयपीएल २०२२ मध्ये त्याच्या सतत खराब कामगिरीमुळे गुजरातच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याला बेंचवर बसवण्यात आले. गुजरात कडून काही सामन्यांमध्ये विजयला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी देण्यात आली होती. मात्र त्याला या संधीचे सोने करता आले नाही. त्याने आयपीएल २०२२ हंगामात खेळलेल्या एकूण ४ सामन्यांत फक्त १९ धावा केल्या. त्याच्या या खराब कामगिरीमुळे पुढच्या वर्षी संघ त्याला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
मनदीप सिंहची खराब कामगिरी
यंदाच्या आयपीएल हंगामासाठी दिल्लीने मंदिर सिंगला आपल्या संघामध्ये सामील केले होते. मनदीपला दिल्लीच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये खेळण्याची संधी मिळाली. मात्र त्याला त्या संधीला साजेशी खेळी करता आली नाही. त्यामुळे काही सामन्यानंतर दिल्लीने त्याला प्लेइंग इलेव्हनमधूनही खाली बसवले. पृथ्वी शॉच्या दुखापतीमुळे मनदिप सिंहला चांगली संधी चालून आली होती. पण तेव्हाही तो संघासाठी चांगली कामगिरी करू शकला नाही. त्यामुळे दिल्ली संघ पुढच्या हंगामात मनदीपला बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.
महत्वाच्या बातम्या:
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

