Share

मानवी हक्कांचा आदर करणे आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक आहे- नवाब मलिक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट करत मानवी हक्कांचा आदर करणे हा आपल्या राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.

आज, मानवी हक्क दिनानिमित्त, आपण एकमेकांच्या हक्कांचा आदर करण्याची आणि चांगल्या आणि अधिक शांततेच्या जगाकडे वाटचाल करण्याची शपथ घेऊ या. असे ट्वीट करत सर्वांनी मानवी हक्कांचा आदर करावे असे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.

दरम्यान या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी ट्वीट करत आजच्या दिनी मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी प्रत्येकाने आपल्या हक्कांबरोबरच इतरांच्या हक्कांबद्दल जागरूक राहणंही तितकंच महत्त्वाचं आहे, त्यासाठी सर्वांनी संकल्प करायला हवा. मानवाधिकार हे वंश,लिंग,राष्ट्रीयत्व,भाषा, धर्म या कशाचाही भेदभाव न करता सर्व मानवांसाठी अंतर्भूत आहेत. मानवी हक्कांमध्ये जीवन आणि स्वातंत्र्याचा हक्क, गुलामगिरी व अत्याचार यांपासून मुक्तता, अभिप्राय आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, काम आणि शिक्षणाचा अधिकार असे इतर हक्क समाविष्ट आहेत. त्यामुळे जगातील प्रत्येक व्यक्तीचे स्वातंत्र्य अबाधित राहावे, त्यांना सन्मानपूर्वक जगता यावे यासाठी १० डिसेंबर हा ‘आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस’ म्हणून साजरा केला जातो. असे ट्वीट खासदार अमोल कोल्हे यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!