पुणे : भारतातील यशस्वी उद्योगपती आणि हमारा बजाज या जाहरातीमुळे देशभरात ज्यांचे नाव पोहचले असे बजाज उद्योग समुहाचे प्रमुख राहुल बजाज यांचे आज पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. गेल्या पाच दशकांमध्ये बजाज उद्योग समूहाला देशभरात आपले पंख पसरावयास राहुल बजाज यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते.
भारतातील उद्योग विश्वात मोलाची कामगिरी केल्याबदलाल त्यांना २००१ मध्ये तत्कालीन अटल बिहारी वाजपेयी सरकारकडून पद्मभूषण देऊन सन्मानित करण्यात आले होते. राहुल बजाज यांचा जन्म १० जून १९३८ साली कोलकत्ता येथे झाला होता. राहुल बजाज यांनी कायदा आणि अर्थशास्र या दोन विषयात पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले होते, तर त्यानंतर हॉवर्ड विद्यापीठामधून त्यांनी ‘एमबीए’चे शिक्षण घेतले. राहुल बजाज हे १९६८ मध्ये बजाज ऑटोमध्ये कार्यकारी अधिकारी पदावर रुजू झाल्यानंतर त्यांनी बजाज ऑटोमध्ये अनेक नवीन प्रकल्प हाती घेतले. बजाज उद्योग समूहाला वाहन उद्योगात मोठं करण्याचं काम राहुल बजाज यांनी केलं होत.
गेल्या वर्षी राहुल बजाज यांनी बजाज ऑटोच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. बजाज उद्योग समूहाला ऑटो उद्योग क्षेत्रात आघाडीवर नेण्यात राहुल बजाज यांचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा होता. राहुल बजाज यांनी गेल्या वर्षी बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर ६७ वर्षीय नीरज बजाज यांच्याकडे बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली होती. १९६५ मध्ये बजाज ऑटोची उलाढाल ३ कोटी रुपयांच्या आसपास होती, ही वाटचाल राहुल बजाज यांनी २०१८ मध्ये १० हजार कोटी पर्यंत पोहचवली.
महत्वाच्या बातम्या :
- समीर वानखेडेंना अनुसूचित जाती आयोगाचा दिलासा! नवाब मलिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
- किरीट सोमय्यांच्या आरोपांवर अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर धाडसत्र सुरूच; नागपुरात सीएची चौकशी
- चंद्रभागेचे पाणी आरोग्यास धोकादायक; भूजल सर्वेक्षण विभागाने दिली माहिती
- VIDEO: गुलाबराव पाटलांचा भाजपला दणका!; ४ नगरसेवकांनी हातात बांधलं शिवबंधन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

