Share

चंद्रभागेचे पाणी आरोग्यास धोकादायक; भूजल सर्वेक्षण विभागाने दिली माहिती

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर: आज माघी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठूरायच्या दर्शनासाठी तीन लाख भाविक दाखल झाले आहेत. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात एकूण सहा वाऱ्या रद्द झाल्या होत्या. आता यंदाच्या माघशुद्ध एकादशीनिमित्त मोठ्या संख्येने भाविक पंढरपूरात दाखल झाले आहेत. कोरोना नियमांचे पालन करून हा कार्यक्रम पार पडणार आहे.

माघी वारीचा मुख्य सोहळा म्हणजे माघी एकादशी, जी मराठी वर्षातील शेवटची वारी म्हणून महत्वाची असते. तळ कोकण, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि मराठवाडा येथून असंख्य भाविक या ठिकाणी येतात. मंदिरात दर्शनाला जाण्यापूर्वी चंद्रभागा नदीत स्नान करतात. तसेच चंद्रभागा नदीचे पाणी तीर्थ म्हणून देखील प्राषन केले जाते. मात्र ते पाणी दूषित झाले असून स्नान करण्यास योग्य नाही. तसेच त्याचे प्राषन केल्याने पोटाच्या व्याधी उद्धभवू शकतात. त्यामुळे मंदिर प्रशासनाने हा नियम यंदाच्या वारीला लागू केला आहे.  भूजल सर्वेक्षण विभागाने दिलेल्या अहवालामध्ये ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

चंद्रभागा नदीच्या पाण्यात शेवाळ, घाण, अळया, किडे आदि गोष्टी आढळून आल्या आहेत. तसेच हे पाणी मलमूत्रमिश्रित असल्याचे समोर आले आहे. चंद्रभागा नदीत स्नान करणारे भाविक अंग खाजवत होते, तसेच काहींना त्वचेवर फोड येताना दिसत आहेत. वारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी स्वच्छता केली नसल्याचा आरोप भाविकांनी केला आहे. तसेच नदीच्या पाण्याचा वापर करू नये असे आवाहन भाविकांना केले गेले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!