भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जंबो कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केला आहे. तसेच या घोटाळ्यात ठाकरे सरकारचा हात असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला होता. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात बोलताना प्रत्युत्तर दिले आहे.
पुण्यातील कोविड सेंटरमध्ये कोट्यवधी रूपयांचा भ्रष्टाचार झाला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यांच्या आरोपांना अजित पवार यांनी यावेळी उत्तर दिले. “पुण्यात एक आणि पिंपरी-चिंचवडमधे एक अशी दोन जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आली होती. या दोन्ही कोविड सेंटरची कामं पारदर्शीपणे केली आहेत. शिवाय दोन्ही कोविड सेंटरमध्ये कोणत्याही राजकीय व्यक्तींचा हस्तक्षेप नव्हता. कोविड सेंटरची सर्व जबाबदारी अधिकाऱ्यांवर होती. मात्र, या जम्बो कोवीड सेंटरबाबत आरोप होत असल्याने आयुक्तांना याबाबत नोट काढण्यास सांगितले आहे. पुण्यातील जम्बो कोविड सेंटरमधे कोणतीही चुकीची गोष्ट झालेली नाही, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

