बीड : दारू पिण्याच्या कारणावरून मारहाण, घातपातासारखे प्रकार तुम्ही ऐकलेले वा पाहिलेले असतील. दारू पितो म्हणून अनेक घर उघड्यावर पडलेत. तर अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झालेत. मात्र, बीड जिल्ह्यात एक वेगळीच घटना समोर आली आहे. दारू प्यायला नकार दिल्याने परळी तालुक्यातील भोपळा शिवारात एका तरुणाला बेदम मारहाण करत दुचाकीला बांधून फरफटत नेले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दारू पिण्यास नकार देणाऱ्या वरवटी (ता. अंबाजोगाई) येथील अशोक वैजनाथ चाटे याला सोबतच्या दोन जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला दुचाकीला बांधून फरफटत नेऊन शेतात सोडले. यात ताो जखमी झाला आहे.
अशोकची आई लक्ष्मी यांच्या तक्रारीनुसार १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या गावातील ज्ञानेश्वर किसन साळुंके हा त्यांच्या घरी आला आणि अशोकला दुचाकीवर बसवून घेऊन गेला. त्यानंतर रात्री दीड वाजता ज्ञानेश्वर साळुंके व मारुती हनुमंत चाटे हे दोघे त्याला भोपला शिवारातील एका ढाब्यावर घेऊन गेले. तिथे दारू का पीत नाहीस? असे म्हणत त्या दोघांनी अशोकला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली.
त्यानंतर अशोकचे पाय दुचाकीला बांधून त्याला फरफटत नेले आणि वरवटी शिवारातील शेतात सोडून दिले होते. सध्या अशोकवर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, दोघांनी अशोकला सोडून दिल्यानंतर अज्ञात व्यक्तीला फोन केला. झालेल्या संभाषणात त्यांनी ‘कार्यक्रम झाला’असा संदेश दिला. त्यामुळे ही झालेली मारहाण ठरवून झाली असावी अशी चर्चा होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- शनिवारपासून राष्ट्रवादीची संवाद यात्रा, जयंत पाटलांच्या उपस्थितीत बीडमधून प्रारंभ
- पंतचे दमदार अर्धशतकटीम; इंडियाचा पहिला डाव 329 धावांवर आटोपला
- महिला पोलिस आधिकाऱ्यांनी पकडली अवैध दारु; आरोपी जेरबंद
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
- रायगड जिल्ह्यातील ‘या’ पर्यटनस्थळांना ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा


