Share

महिला पोलिस आधिकाऱ्यांनी पकडली अवैध दारु; आरोपी जेरबंद

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यात कायगाव येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या आरोपीला प्रभारी महिला सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी धडक कारवाई करत आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपीकडे अवैध देशी दारुता ४५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महिला पोलिस आधिकाऱ्याने केलेल्या या कारवाईमुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सिल्लोड तालुक्यात वडोदबाजार पोलीस ठाणे येथे सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव कार्यरत आहेत. कायगाव, पीरबावडा येथे अवैध दारु विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी दुपारी कायगाव येथे धडक कारवाई केली. यावेळी आरोपी शिवाजी कडूबा शेळके व बाबू किसन जगदडे, पंडित रखमाजी खरात रा. कायगाव ता. सिल्लोड यांनी स्वतःहाच्या फायदयासाठी देशी दारूच्या अवैध विक्रीसाठी ठेवली होती. आरती जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मोरे, डी. डी. निकम अन्य साथीदारांनी कारवाई करत कायगाव येथे दुकानात ठेवलेली दारू जप्त केली.

यावेळी पोलीसांनी आरोपी शिवाजी कडुबा शेळके व बाबू किसन जगदडे रा. कायगाव ता. सिल्लोड याच्या ताब्यातून ५७ बॉटल एकूण किंमत ४५६० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तर दुसऱ्या कारवाईत कायगाव बसस्टँड येथील आरोपी पंडित रखमाजी खरात यांच्याकडून १८० मिलीच्या ११ बॉटल ८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर तिसऱ्या कारवाईत पिरबावडा येथे असलेल्या हॉटेल शिवाजी येथे आरोपी भगवान गाडेकर यांच्याकडे ९० मिली च्या देशी दारुच्या बॉटल आढळून आल्या. या एकामागोमाग धडक कारवाईमुळे आरती जाधव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!