Share

मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन

Published On: 

🕒 1 min read

चेन्नई : चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात कालपासून दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद३०० धावा केल्या आहेत. भारताकडून पहिल्या दिवसाखेर रिषभ पंत ५६ चेंडूत ३३ धावांवर नाबाद आहे. तर अक्षर पटेल ७ चेंडूत ५ धावांवर नाबाद आहे. इंग्लंडकडून पहिल्या दिवसाखेर जॅक लीच आणि मोईन अलीने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच ऑली स्टोनने १ विकेट घेतली.

रोहितचे कसोटी क्रिकेटमधील हे सातवे शतक ठरले आहे. रोहितने यावेळी १३० चेंडूंमध्ये आपेल शतक साजरे केले.श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड या चारही संघांविरूद्ध सर्व फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा रोहित पहिला खेळाडू ठरला. घरच्या मैदानावर कमीत कमी १० कसोटी खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सरासरीच्या बाबतीत रोहितने जगात दुसरं स्थान पटकावलं. या यादीत ऑस्ट्रेलियाचे डॉन ब्रॅडमन ९८.२ च्या सरासरीने अव्वल आहेत. तर रोहितची सरासरी ८४.७ इतकी आहेत.

व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशी रोहित शर्माने  चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आपला सर्वोत्तम खेळ करत 7वे कसोटी शतक झळकावले. यादरम्यान, ‘हिटमॅन’ची पत्नी रितिका सजदेह  स्टँड्समधून त्याला चीअर करताना दिसली. दुसर्‍या कसोटी सामन्यात फिरकी अनुकूल खेळपट्टीवर यजमान संघाने पहिल्या दिवसाखेर 6 बाद 300 धावांपर्यंत मजल मारली ज्यात रोहितने सर्वाधिक 161 धावांचे योगदान दिले.

दरम्यान, रोहितची आयपीएल (IPL) मुंबई इंडियन्सने रोहितच्या शतकी खेळीचा आणि व्हॅलेंटाईन डे यांच्यातील एक खास कनेक्शन उघड केलं आहे आणि ते म्हणजे रोहितने व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या दिवशीआंतरराष्ट्रीय शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. 2018 मध्ये रोहितने पोर्ट एलिझाबेथमध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध मॅच-विनिंग शतक ठोकले होते. शिवाय, पत्नी रितिका स्टॅन्डमधून चीअर करत असताना रोहितने मोठा डाव खेळण्याची ही पहिली वेळ नाही. तसेच, 2017 मध्ये रोहितने 13 डिसेंबर रोजी आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त श्रीलंकाविरुद्ध द्विशतक शतक ठोकले होते. आणि त्याच वर्षी रोहितने पत्नी रितिकाचा वाढदिवस आणखी खास करत श्रीलंकेविरूद्ध चौथे टी-20 शतकांपैकी एक शतक ठोकले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!