चेन्नई : चेन्नईमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड संघात कालपासून दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या दिवसाखेर ८८ षटकात ६ बाद ३०० धावा केल्या. या धावसंख्येपासून दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली आहे. परंतु दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडच्या गोलंदाजांनी तळातील भारतीय फलंदाजांच्या पटापट विकेट काढल्या. त्यामुळे ९५.५ षटकात ३२९ धावांवर भारताचा पहिला डाव संपुष्टात आला. इंग्लंडला पहिल्या डावात ३३० धावांचे आव्हान मिळाले आहे.
सामन्याच्या सुरुवातीलाच मोईनने टीम इंडियाला एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले आहेत. पदार्पणवीर अक्षर पटेलला बाद केल्यानंतर मोईनने इशांतला शून्यावर माघारी धाडलं. पहिल्या दिवशी कोहलीसह गिल आणि पुजारा स्वस्तात बाद झाल्यावर रोहित आणि रहाणे यांच्यात चांगली भागीदारी झाली. रोहित शर्माने आपल्या कसोटी कारकीर्दीचे 7वे शतक ठोकले तर, रहाणेने 23वे कसोटी अर्धशतक करून पॅव्हिलियनमध्ये परतला. दोघांमधील चौथ्या विकेटसाठी 161 धावंच्या भागीदारीने संघाचा डाव सावरला आणि मोठ्या धावसंख्येचा पाय रचला.
चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना पाहुण्या संघाने जिंकत सिरीजमध्ये 0-1 आघाडी घेतली आहे. त्यामुळे, आता मालिकेत आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान कायम ठेवण्यासाठी टीम इंडियाला चेन्नईच्या एम. ए चिदंबरम स्टेडियमवर सुरु असलेल्या दुसऱ्या सामन्यात विजय मिळवणे गरजेचं आहे.
महत्वाच्या बातम्या
- माथाडींच्या पीएफ घोटाळ्याची चौकशी करा, खा.जलील यांची संसदेत मागणी
- Fact Check : एप्रिल महिन्यात सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांच्या सेवा पुन्हा सुरू होणार ?
- एकापाठोपाठ एक विकेट्स पडत असताना रोहित शर्मा मैदानात पहाडासारखा उभा राहिला
- जागतिक रेडिओ दिन : रेडिओ आणि तरुणाईचं नातं
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

