🕒 1 min read
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची परिवार संवाद यात्रा मराठवाड्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यातील महाविकास आघाडीकडून जनतेला काय अपेक्षा आहेत हे ते संवाद यात्रेतून जाणून घेणार आहेत. तर या संवाद यात्रेची सुरुवात बीड येथून शनिवारपासून (दि. २०) होणार आहे.
या परिसंवाद यात्रेत पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. ही संवाद यात्रा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जावून ते लोकप्रतिनिधींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. विदर्भ, कोकण पाठोपाठ २० फेब्रुवारीपासून ते मराठवाडा दौऱ्यावर आहेत.
आपल्या परिसरातील व मतदारसंघात कुठले प्रश्न आहेत? ते प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काय केले, काय करावे लागेल यासह अन्य बाबींवर चर्चा करण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या कामाचा आढावा घेण्यासाठी ही संवाद यात्रा २० फेब्रुवारीला बीडमध्ये येत आहे. २१ फेब्रुवारीला शिरूर, गेवराई, माजलगाव, परळी, अंबाजोगाई आणि पुढे लातूर जिल्ह्याकडे मार्गस्थ होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- माथाडींच्या पीएफ घोटाळ्याची चौकशी करा, खा.जलील यांची संसदेत मागणी
- Fact Check : एप्रिल महिन्यात सर्व प्रवासी रेल्वेगाड्यांच्या सेवा पुन्हा सुरू होणार ?
- एकापाठोपाठ एक विकेट्स पडत असताना रोहित शर्मा मैदानात पहाडासारखा उभा राहिला
- जागतिक रेडिओ दिन : रेडिओ आणि तरुणाईचं नातं
- मुंबई इंडियन्सने उघड केले रोहित शर्माच्या याच्या शतकी खेळीचे ‘व्हॅलेंटाईन डे’ कनेक्शन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
