औरंंगाबाद : भंगारच्या गोडावूनचे लॉक तोडून गोडावून मधील अल्युमिनिअम व लोखंडी साहित्य असा सुमारे ६५ हजारांचा ऐवज चोरणार्या चार जणांच्या टोळीच्या एमआयडीसी सिडको पोलिसांनी मुसक्या आवळल्या. चोरट्यांकडून चोरलेल्या ऐवजापैकी ४० हजारांचे साहित्य आणि एक रिक्षा असा सुमारे एक लाख १५ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या चौघांना शनिवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी गुरुवारी (दि.१३) दिले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवि रमेश गायकवाड (वय ३२), बाळु रावसाहेब गायकवाड (वय २२), विजय दामोधर चौथमल (वय ४२, सर्व रा. ब्रिजवाडी) आणि भानुदास दामोधर मोरे (वय ५५, रा. राजेंद्रनगर, नारेगाव) अशी भंगार साहित्य चोरी करणार्या टोळीतील सदस्यांची नावे आहेत.
नारेगाव येथील राजेंद्रनगरात राहणारे राजेश गुनानंद झा (वय ३६, मुळ रा. बेलाम, रैयम ता. रहिकाजि. मधुबन, बिहार) यांची एमआयडीसीत मुस्कान स्टील नावाचे भंगारचे गोडावून आहे. ११ मे रोजी सकाळी झा हे नेहमी प्रमाणे गोडावून गेले असता त्यांना गोडावूनच्या भिंती लगत अल्यूमिनीयम आणि लोखंडाचे सामान पडलेले दिसले. त्यांनी गोडावूनची पाहणी केली असता ६५ हजारांचे साहित्य चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला टीम इंडियाचा अभिमान’ ; रवी शास्त्री यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

