Share

जालन्यात ५९१ नव्या रुग्णांची वाढ तर ११ बाधितांचा मृत्यू

Published On: 

जालना: कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यात चिंतेचे वातावरण बघायला मिळत आहे. नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांना रुग्णालयांमध्ये खाटा उपलब्ध होत नसल्याने त्यांच्यावर उशिरा उपचार होत असल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. तसेच कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या देखील जास्त आहे. गुरुवारी एकूण ११ रुग्णांचा उपचारादरम्यान जीव गेला आहे तसेच ५९१ नव्या रुग्णांची भर पडली आहे.

गुरुवारी उपचारादरम्यान ११ बाधितांचा मृत्यू झाला तर ५९१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच यशस्वी उपचारानंतर ३०४ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले. गुरुवारी जिल्ह्यातील ६३ केंद्रांवर ५ हजार ७१६ लाभार्थींनी लस घेतली असून आतापर्यंत २ लाख ५९ हजार ५३८ जणांचे लसीकरण झाले. यात जालना शहर ९६, भाटेपुरी २, भाटेपुरी २, चंदनझिरा १, चितळी १, धावडी २, दुधना काळेगाव १, गवळी पोखरी २, घोडेगाव १, गोलापांगरी १, गोंदेगाव १, हिसवन १, काकडा २, काळेगाव १, कोठा जहागिर १, ममदाबाद १, मौजपुरी, नागेवाडी १, नेर २, व इतर ग्रामीण भाग.

आरटीपीसीआरद्वारे ५४७ तर अँटिजनमधून ४४ असे एकूण ५९१ अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांनी दिली. जिल्ह्यात एकूण ३ लाख १४ हजार ७४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यापैकी ५४ हजार ६६० अहवाल पॉझिटिव्ह, तर २ लाख ५६ हजार ६०० निगेटिव्ह आले. तसेच प्रयोगशाळेत ३ हजार १४८ नमुने प्रलंबित आहेत. दरम्यान, आतापर्यंत एकूण ४७ हजार ८८० रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी गेले असून दुर्दैवाने ९०७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर सध्या ५ हजार ८७३ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!