औरंगाबाद : अक्षयतृतीया व ईद-उल-फित्र यानिमित्ताने कोविड केअर सेंटर मधील रुग्ण तथा आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी अन्नामृत फाउंडेशनतर्फे आमरस, शेवया, मिष्ठान्न सुरुची भोजन देण्यात येणार आहे. यात एमआयटी केअर सेंटर, सिपेट कोविड केअर सेंटर मधील डॉक्टर, रुग्ण व कर्मचाऱ्यांना या मेजवानीचा आनंद मिळणार आहे. याआधी देखील अन्नामृतने रुग्णांना अशाप्रकारच्या भोजनाचा आनंद दिला आहे.
देवकीनंदन क्षुधा सन्मान करुणा उपक्रमाअंतर्गत परावलंबी ज्येष्ठ नागरिक सेवा अंकुर प्रकल्प अंतर्गत, लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीसाठी काम करणारे मेडिकल विद्यार्थी, शासकीय कर्करोग रुग्णालय आणि शासकीय महाविद्यालय रुग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक अशा दीड हजार जणांनाही आमरसाचे जेवण देण्यात येणार आहे. आमरस, शेवया, चपाती-भाजी, चकली हा विशेष मेन्यू यात असणार आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेने मागील दीड महिन्यात शहरात चांगलेच थैमान घातले होते. मात्र आता मागील पंधरा दिवसांपासून रोज नव्याने आढळणार्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. पूर्वी हजारच्या घरांत असणारी रोजची रुग्णांची संख्या ही आता तिनशे ते चारशेवर येऊन ठेपली आहे. दुसरीकडे कोरोनातून बरे होणार्या रुग्णांचे प्रमाणही ९४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. यामुळे शहरवासीयांसह आरोग्य यंत्रणेला सुखद दिलासा मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर उत्सवात कमी होणाऱ्या रुग्णसंख्येमुळे अधिक भर पडतांना दिसत आहे.
मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय, आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर, शहर अभियंता सखाराम पानझडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम होत आहे. यामध्ये सुजित उकळकर, दीपक आठवले, योगिता सातपुते, संदीप शिसोदे, अरविंद पाथ्रीकर, अमित शहा, मनपा जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार हे विशेष परिश्रम घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- सलूनचालकाची आत्महत्या! अनेक दिवसांपासून होती आर्थिक विवंचना
- मंठ्यात नागरिक दुसऱ्या ‘डोस’च्या प्रतीक्षेत
- १८ वर्षांखालील मुलांमध्ये कोरोनाची काही लक्षणे आहेत का? आता शिक्षक करणार सर्वेक्षण
- सोशल मीडियावर ओळखीनंतर तरूणीवर अत्याचार! पीडितेची दोन लाख रूपयांची फसवणूक
- शॉक लागल्याने मजूराचा मृत्यू, बांधकामाच्या ठिकाणी भिंतीचे प्लास्टर करताना घडली घटना


