🕒 1 min read
औरंंगाबाद : दुचाकीवर बनावट क्रमांक टाकून फिरणार्या अक्षय पुरुषोत्तम खंदारे (वय २५, रा. पंढरपुर, काचीपुरा झोपडपट्टी) याला नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी अटक केली असून त्याला शनिवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.पी.पाडवी यांनी गुरूवारी (दि.१३) दिले. अक्षय खंदारे याला बाबा पेट्रोलपंप चौकात नाकाबंदी करणार्या पोलिसांनी पकडले होते.
वेदांतनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राहुल भदरगे (वय ४०) हे आपल्या सहाकार्यांसह बाबा पेट्रोलपंप चौकात नाकाबंदी मोहिम राबवत होते. त्यावेळी अक्षय खंदारे हा दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एडी-४७९७) वर नगरनाक्याकडून बाबा पेट्रोलपंपाकडे येत होता. पोलिसांनी त्याला अडवून दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली.
पोलिसांनी खंदारे याच्या दुचाकीच्या चेसीस नंबर ई-चलन मशीनव्दारे तपासला असता सदर दुचाकी ही दादासाहेब हेकडे (रा. माळीवाडा) याच्या नावावर असल्याचे समोर आले. पोलिसांनी दुचाकी जप्त करुन आरोपी खंदारे याला अटक केली. प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘मला टीम इंडियाचा अभिमान’ ; रवी शास्त्री यांनी केले भारतीय संघाचे अभिनंदन
- सोशल मीडियासाठी काढलेल्या ६ कोटी रुपयांच्या कंत्राटावर अजित पवारांचे मोठे भाष्य,म्हणाले…
- ‘केंद्राने महाराष्ट्रात पुरवलेल्या व्हेंटिलेटरमध्ये मोठा घोटाळा’, काँग्रेसचा आरोप
- …तर त्यांना बाजूला घेऊन नाराजी सांगेन; कथित नाराजी नाट्यावर अजितदादांच खटक्यावर बोट !
- ठरलं ! स्पुटनिक व्ही लसीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये


