Share

सलूनचालकाची आत्महत्या! अनेक दिवसांपासून होती आर्थिक विवंचना 

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : वर्षभरापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेले कटिंग सलूनचालक विलास उत्तम ठाकरे (वय ३५, रा.वैâलासनगर) यांनी दुकानातच गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी रात्री आठ वाजता ही धक्कादायक घटना समोर आली.
विलास ठाकरे यांचा भोईवाड्यात मागील पंधरा वर्षांपासून केश कर्तनालयाचा व्यवसाय होता. दोन मुले, पत्नीसोबत ते कैलासनगरमध्ये राहत होते.

मागील वर्षभरापासून कोरोना संकटामुळे लागलेल्या निर्बंधाने त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता. जून-जुलैमध्ये बाजारपेठ उघडल्यावर त्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, एप्रिल महिन्यापासून पुन्हा कडक लॉकडाऊन सुरू झाला आणि त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. दुकानच बंद पडले. पंधरा वर्षांपासून त्याच परिसरात व्यवसाय करत असल्याने त्यांचा मोठा मित्रपरिवार होता.

बुधवारी त्यांनी काही मित्रांना संपर्क करून भोईवाड्यात येत असल्याचे कळवले. साधारण सहा वाजेच्या सुमारास त्यांनी त्यांचे दुकान उघडले. ते येत असल्याची कल्पना आधीच असल्याने साडेसात ते आठच्या सुमारास काही मित्र त्यांना भेटण्यासाठी गेले. तेव्हा दुकानाचे शटर अर्धवट लावलेले होते.

मित्रांनी शटर उघडले असता ठाकरे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. हे पाहून धक्का बसलेल्या मित्रांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र वर्षभरापासून व्यवसाय बंद असल्याने त्याच्या आाfर्थक अडचणींमुळे त्यांनी जीवन संपवले असावे असा प्राथमिक अंदाज आहे. या प्रकरणी क्रांती चौक पोलिस अधिक तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!